Full Text
प्रकाशनयोग्य
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात
दिवाणी अपील अधिकार क्षेत्र
दिवाणी अपील क्रमांक ५३७३ / २०१९
हेवलेट पॅकर्ड इंडिया सेल्स प्रायव्हेट लिमिटेड ...अपीलार्थी
( आता एच पी इंडिया सेल्स प्रायव्हेट लिमिटेड )
विरुद्ध
कमिशनर ऑफ कस्टम्स (इम्पोर्ट ) न्हावा शेवा ...उत्तरवादी
[ आयुक्त सीमाशुल्क ( आयात ) न्हावा शेवा ]
सह
दिवाणी अपील क्र. ६७१५ /२०१९
लेनेवो (भारत) प्रायव्हेट लिमिटेड … अपीलार्थी
वि.
आयुक्त सीमाशुल्क ( आयात ) न्हावा शेवा … उत्तरवादी
सूर्य कांत, न्या .
१. आमच्या विचारार्थ जो प्रश्न उभा राहतो तो स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग यंत्राचे वर्गीकरण (पुढे, 'ए डी पी ' असे सं बोधले आहे ) 'ऑल इन वन इंटिग्रेटेड डेस्कटॉप कॉम्प्युटर' [सर्व समावेशक
संगणक ] (पुढे, 'संबं धित वस्तू' असे सं बोधले आहे ) म्हणून ओळखले जाते आणि जी कें द्रीय
उत्पादन शुल्क कायदा, १९८५ च्या पहिल्या अनुसूची मध्ये अंतर्भूत आहे (यानंतर 'प्रथम अनुसूची'
संबोधले आहे ).
तथ्ये
२. अपीलकर्त्यांनी संबं धित वस्तूंच्या काही युनिट्सची ( नागांची ) आयात के ली आणि प्रचलित स्व-
मूल्यांकन प्रक्रियेनुसार त्यांना 'टॅरिफ आयटम ८४७१ ५० ००' अंतर्गत वर्गीकृ त के ले. कस्टम (
सीमाशुल्क )अधिकार्
यांकडून नंतरच्या तपासणी दरम्यान, संबं धित वस्तूंचे 'टेरिफ आयटम
८४७१ ३० १०' अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले, ज्याला नंतर सहाय्यक सीमा शुल्क आयुक्त
आणि सीमा शुल्क आयुक्त (अपील) यांनी दुजोरा दिला. सीमाशुल्क, उत्पादन शुल्क आणि
( अबकारी कर ) सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (यानंतर, 'सी ई एस टी एटी'), पश्चिम
सदरच्या निष्कर्षांना पुष्टी दिली
३. दोन्ही टॅरिफ आयटमअंतर्गत शुल्काचा दर समान असला तरी त्यांची मोजणी करण्याची पद्धत
वेगळी आहे. 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत वस्तूंवर कें द्रीय उत्पादन शुल्क अधिनियम, १९४४ चे कलम ४ ए लागू के ले जाते, ज्यात किरकोळ विक्री किं मतीच्या टक्के वारीच्या आधारावर
उत्पादन शुल्क पात्र वस्तूंचे मूल्यांकन के ले जाते. याउलट 'टॅरिफ (प्रशुल्क/ शुल्क ) आयटम
८४७१ ५० ००' अंतर्गत वर्गीकरण के ल्यास कें द्रीय उत्पादन शुल्क कायदा, १९४४ च्या कलम ४
अन्वये किं मत यंत्रणेवर आधारित मूल्यमापन के ले जाते, ज्यामुळे अपेक्षित शुल्क भरण्याची एकू ण
जबाबदारी प्रभावीपणे कमी झाली असती दायित्वातील हा फरकच योग्य टॅरिफ आयटम अंतर्गत
वर्गीकरणासंबं धी सध्याच्या वादामागील नेमके कारण आहे आणि ज्यात निर्णय घेण्याची
आवश्यकता आहे.
४. महसूल अधिकारी आणि सी ई एस टी ए टी यांच्या युक्तिवादाचा अभ्यास करण्यापूर्वी, जे
कमी-अधिक प्रमाणात समानच आहे आणि म्हणून प्रथम अनुसूचीतील खालील संबं धित भागांचे
पुनरुचारण करणे येथे योग्य ठरेल :
शीर्षक/उप शीर्षक/शुल्क वस्तू ( नग)1
मालाचे वर्णन 2
(२)
८४७१ स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग यंत्र आणि त्यांची
युनिट्स; चुंबकीय किं वा ऑप्टिकल रीडर्स, कोडेड स्वरूपात डेटा मीडियावर डेटा
लिप्यंतरण करण्यासाठी यंत्र आणि अशा
डेटावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र , आणि जी
इतरत्र निर्दिष्ट किं वा समाविष्ट नाहीत
८४७१ ३० पोर्टेबल ( सहज ने - आण करण्याजोगे )
डिजिटल ऑटोमॅटिक डेटा प्रोसेसिंग यंत्र , ज्याचे वजन 10 किलोपेक्षा जास्त नाही, ज्यामध्ये किमान एक मध्यवर्ती प्रक्रिया कें द्र, कळफलक आणि डिस्प्ले ( पडदा ) असतो
11 अतिरिक्त नोट्स सीमा शुल्क कायदा 1975, sch 1 असे नमूद करतो की
(a) “शीर्षक”, वस्तूंच्या सं दर्भात, म्हणजे चार अंकी क्रमांकासह टॅरिफ तरतुदींच्या यादीतील वर्णन आणि त्यात पहिल्या चार अंकांशी सं बं धित असलेल्या
टॅरिफ वस्तूंच्या सर्व उपशीर्षकांचा समावेश आहे, तो नंबर.
(b) “उपशीर्षक””, वस्तूंच्या सं दर्भात, म्हणजे सहा अंकी क्रमांकासह असलेल्या दर तरतुदींच्या सूचीतील वर्णन आणि त्या सं ख्येशी सं बं धित सर्व टॅरिफ
वस्तूंचा समावेश आहे.
(c) “टेरिफ आयटम” म्हणजे सीमा शुल्क कायदा 1975 मधील सहा अंकी क्रमांकासह टॅरिफ तरतुदींच्या यादीतील वर्णन म्हणजे आठ अंकी सं ख्या
आणि अबकारी शुल्काचा दर किं वा रिक्त असलेल्या आठ अंकी क्रमांकासह टॅरिफ तरतुदींच्या यादीतील वस्तूंचे वर्णन शुल्क दराच्या स्तंभात.
2 सामान्य स्पष्टीकरणात्मक नोट्स , sch 1 सीमा शुल्क कायदा 1975, sch 1 असे नमूद करतो की
JUDGMENT
1. या अनुसूचीच्या स्तंभ (2) मध्ये, जेथे शीर्षकाखाली लेख किं वा लेखांच्या गटाचे वर्णन “” च्या आधी दिलेले असेल, तो लेख किं वा लेखांचा समूह हा लेख किं वा गटाचे उपवर्गीकरण मानले जाईल. या मथळ्याने कव्हर के लेले लेख. तथापि, जेथे लेखाचे किं वा लेखांच्या गटाचे वर्णन “” च्या अगोदर दिलेले असेल, तो लेख किं वा लेखांचा समूह हा “” असलेल्या लेखाच्या किं वा लेखांच्या गटाच्या तत्काळ आधीच्या वर्णनाचे उपवर्गीकरण मानले जाईल.. जेथे एखाद्या लेखाचे किं वा लेखांच्या गटाचे वर्णन “” किं वा “” च्या अगोदर आलेले असेल, तो लेख किं वा लेखांचा समूह हा लेखाच्या किं वा लेखांच्या गटाच्या तत्काळ आधीच्या वर्णनाचे उपवर्गीकरण मानले जाईल ज्यामध्ये “” किं वा "". ८४७१ ३० १० वयक्तिक सं गणक ८४७१ ३० ९० इतर इतर ऑटोमॅटिक डेटा प्रोसेसिंग यंत्र, ८४७१ ४१ एकाच संच-साच्यात समाविष्ट, कमीत कमी एक कें द्रीय प्रक्रिया युनिट आणि एक इनपुट आणि, आउटपुट युनिट एकत्रित असो वा नसो ८४७१ ४१ १० लघु संगणक ८४७१ ४१ २० मोठा किं वा मेन फ्रे म संगणक ८४७१ ४१ ९० इतर ८४७१ ४१ ०० इतर, संचाच्या प्रकारात असलेला ८४७१ ५० ०० उपशीर्षक ८४७१४१ किं वा ८४७१४९ त्या व्यतिरिक्त इतर प्रक्रिया युनिट्स आणि ते एक किं वा दोन संचात समाविष्ट असो वा नसो ते युनिट खालील प्रमाणे: स्टोरेज युनिट्स, इनपुट युनिट्स, आउटपुट युनिट्स
5. सीईएसटीएटी सह न्यायनिर्णय देणाऱ्या अधिकाऱ्यांनी 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत वर्गीकरणाची पुष्टी करणारा युक्तिवाद समान के ला असल्याने, संबं धित निर्णयांच्या मुख्य निष्कर्षांवर थोडक्यात चर्चा करणे पुरेसे ठरेल. आणि ती निरीक्षणे खालील प्रमाणे आहेत:. अ) संबं धित वस्तूंचे वजन१० किलोग्रॅमपेक्षा कमी होते आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेले जात होते. या संदर्भात सी ई एस टी ए टी ने 'पोर्टेबल' शब्दाच्या, शब्दकोषातील अर्थावर, विश्वास ठेवला, की मालाचे 'टेरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत योग्यरित्या वर्गीकरण के ले गेले आहे. ब ) अंगभूत उर्जा स्त्रोताच्या अनुपस्थितीमुळे संबं धित वस्तू नॉनपोर्टेबल ( सुटसुटीत नसणारी / सहज ने- आण करण्याजोगे नसणारे ) म्हणून गणली जाणार नाही; क ) संबं धित वस्तूंचे आकारमान तसेच ते फोल्ड ( घडी ) करण्यायोग्य नसल्यामुळे पोर्टेबिलिटीच्या ( सुटसुटीत असण्याचा ) घटकावर परिणाम झालेला नाही; ड ) संबं धित वस्तूंमध्ये डिस्प्ले युनिट ( दृश्य फलक ), एक टच स्क्रीन ( स्पर्श पडदा ) होती जी कीबोर्ड ( काळ फलक ) म्हणून कार्य करू शकते आणि अशा प्रकारे ते 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' खाली नमूद के लेले वर्णन पूर्ण करते. ब. विवाद ६. आम्ही पक्षकारांच्या विद्वान वकिलांचे म्हणणे ऐकले आणि अभिलेखावर सादर के लेली कागदपत्रे विचारात घेतली आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे की सं बं धित वस्तूंच्या पोर्टेबिलिटीच्या पैलूव्यतिरिक्त दोन्ही बाजूं नी निर्णय अधिकाऱ्यांच्या निष्कर्षांवर वाद घातला नाही. म्हणूनच, या कार्यवाहीमध्ये आमच्यासमोर विचारात घेतलेला एकच मर्यादित प्रश्न हा आहे की संबं धित वस्तू 'पोर्टेबल' आहेत किं वा 'टेरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत नाहीत. 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत वर्गीकरणात 'कार्यक्षमता' या घटकाचा समावेश आहे, जो सध्याच्या परिस्थितीत लागू होत नाही कारण संबं धित वस्तू विजेच्या बाह्य स्त्रोताशिवाय कार्य करण्यास सक्षम नाहीत, असे त्यांनी अधोरेखित के ले आहे. ७. याचिकाकर्त्यांचे विद्वान वकील श्री व्ही लक्ष्मीकु मारन यांनी चार महत्त्वाचे युक्तिवाद के ले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' हा लॅ पटॉप किं वा नोटबुक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ए डी पी च्या वर्गाशी संबं धित आहे. 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत वर्गीकरणात 'कार्यक्षमता' या घटकाचा समावेश आहे, जो सध्याच्या परिस्थितीत लागू होत नाही कारण सं बं धित वस्तू विजेच्या बाह्य स्त्रोताशिवाय कार्य करण्यास सक्षम नाहीत, असे त्यांनी अधोरेखित के ले आहे.दुसरे म्हणजे, त्यांनी असा युक्तिवाद के ला की संबं धित वस्तूंचे वजन १० किलोग्रॅमपेक्षा कमी आहे या एकमेव पैलूवर सी ई एस टी ए टी ने त्यांना चुकीच्या पद्धतीने 'पोर्टेबल' मानले आहे. के वळ वजन हा एकमेव मापदंड असू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी के ला आणि कोणतीही वस्तू 'पोर्टेबल' आहे की नाही हे ठरवण्यासाठी वापरकर्त्याच्या मोबाइल जीवनशैलीसाठी उपयुक्त असलेल्या कार्यक्षमता आणि वाहतूक सुलभता यासारख्या अतिरिक्त बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, सी ई एस टी ए टी शब्दकोशांमध्ये दिलेल्या 'पोर्टेबल'च्या सर्वसाधारण व्याख्येवर चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवला आणि त्याऐवजी वस्तूंच्या वर्गासंदर्भात, म्हणजे ए डी पी च्या संदर्भात त्याची व्याख्या करायला हवी होती, असा आग्रह त्यांनी धरला. या संदर्भात त्यांनी वस्तूंच्या वर्णनात 'पोर्टेबल' असण्याची अट असलेल्या संबं धित 'सबहेडिंग ८४७१ ३०'च्या आधी एकच '' असून परिणामी या उपशीर्षकाखालील सर्व वस्तू 'शीर्षक ८४७१' अंतर्गत समाविष्ट वस्तूंचे उपवर्गीकरण म्हणून घ्याव्यात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेवटी, वरील युक्तिवादांना पुष्टी देण्यासाठी, त्यांनी अधोरेखित के ले की संबं धित वस्तू युरोपियन आयोगाच्या वर्गीकरणानुसार 'पोर्टेबल' मानल्या जात नाहीत आणि जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या सुसूत्र प्रणाली व्याख्यात्मक नोट्स (पुढे, 'एच एस एन' असे सं बोधले आहे ) नुसार 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' मध्ये समाविष्ट नाहीत. आम्ही देखील हि गोष्ट सर्वांसमोर आणली पाहिजे आणि अपीलकर्त्यांसाठी विद्वान वकिलांच्या प्रयत्नांचे कौतुक के ले पाहिजे की त्यांनी संबं धित वस्तूंच्या नमुना नगांपैकी एक स्थापित करून या प्रकरणातील पोर्टेबिलिटीचे पैलू प्रदर्शित करण्यासाठी येथे ( न्यायालयात ) स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले. ८. याउलट उत्तरवादी यांचे विद्वान ज्येष्ठ वकील अर्जित प्रसाद यांनी या निर्णयातील निरीक्षणांचे समर्थन करताना दोन प्रतिवाद मांडले. पहिली गोष्ट म्हणजे कायद्यात 'पोर्टेबल' या शब्दाची कु ठेही व्याख्या नसल्याने त्याचा अर्थ सामान्य भाषेच्या तत्त्वावर लावला गेला पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, 'पोर्टेबल' या शब्दाचा शब्दकोशाचा अर्थ त्याच्या अर्थासंबं धीचा वाद मिटविण्यासाठी पुरेसा आहे, असे त्यांनी मांडले. दुसरं म्हणजे १० किलोपेक्षा कमी ए डी पी आपोआप पोर्टेबल होईल, अशी अट वर्णनात घालून 'पोर्टेबल' हा शब्द ग्राह्य धरण्यात विधिमंडळाचा हेतू अगदी स्पष्ट होता, असे त्यांनी नमूद के ले. या युक्तिवादाच्या अनुषं गाने त्यांनी मथुराम अग्रवाल विरुद्ध एमपी राज्य[3] या खटल्यातील या न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा आधार घेत कर-कायद्यात वापरल्या जाणाऱ्या भाषेच्या साध्या आणि निः संदिग्ध अर्थावरून विधिमंडळाचा हेतू समजून घ्यावा आणि इतर कोणताही अर्थ अमान्य आहे, असा आग्रह धरला. ९. आता आम्ही दोन्ही पक्षांच्या या वादांचे परीक्षण करतो. विश्लेषण 3 मथुराम अग्रवाल विरुद्ध एमपी राज्य 1999)8 SCC 667, परी 12. १०. संबं धित वस्तू 'पोर्टेबल' आहे की नाही या प्रश्नावर विचार करण्यापूर्वी, त्यांची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे अधोरेखित करणे योग्य होईल: अ) सेंट्रल प्रोसेसिंग युनिट डिस्प्ले युनिटमध्ये कायमस्वरूपी जोडलेले आहे काय. ब) डिस्प्ले युनिट हे सामान्यतः टच स्क्रीन असते जसे की कीबोर्ड किं वा माउसच्या जे इनपुट युनिट क्षमतेमध्ये देखील वापरले जाऊ शकते,; क ) युनिट्स सामान्यत: ध्वनिक्षेपक समाविष्ठ स्वरूपात, तसेच पुढील जोडणीसाठी पोर्टसह इंटरनेट नेटवर्क शी लिंक स्थापित करण्यासाठी पोर्टसह येतात; ड ) डिस्प्लेची कर्ण लांबी किमान १८.५ इंच आहे. हे स्पष्ट के ले जाऊ शकते की सध्या संबं धित वस्तूंचे काही नमुने डिस्प्लेची कर्ण लांबी २५ इंच इतकी रुं द करून सुद्धा वजन १० किलोग्रॅम[4] पेक्षा कमी आहेत; इ ) त्याला कार्य करण्यासाठी बाह्य उर्जा स्त्रोताचा सतत पुरवठा आवश्यक आहे; फ ) हे फोल्ड ( घडी ) करण्यायोग्य नाही आणि त्याच्या परिमाणांमुळे नेहमीच्या लॅ पटॉप च्या पिशवीत ठेवता येत नाही; 4 हे लक्षात घेतले पाहिजे की सध्याच्या बाजारातील ट्रेंडच्या सं दर्भात, सामान्यत: सर्वात मोठा डिस्प्ले सुमारे १७ इंच असतो. ग ) कार्यक्षम कार्यसाठी संबं धित वस्तू उभ्या अवस्थेत राहणे आवश्यक आहे आणि सोबत प्रदान के लेल्या स्टँडशी जोडलेले असणे आवश्यक आहे किं वा भिंतीसारख्या इतर गोष्टीचा आधार घेऊन जोडलेल्या स्तिथितीत लावणे आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की सं बं धित वस्तूंच्या नमुन्यापैकी एका नमुन्याचे वापरकर्ता मार्गदर्शक अभिलेखावर आले आणि ते असे सूचित करते की क्षैतिज स्थितीत वापरण्याची पद्धत सोडून इतर पद्धत हानिकारक आहे आणि संबं धित वस्तूंचे त्यामुळे नुकसान होऊ शकते. ११. पहिला पैलू ज्याला आपण संबोधित करणार आहोत तो उर्जेच्या स्थिर स्त्रोताच्या मुद्द्याशी संबं धित आहे आणि वस्तूंना 'पोर्टेबल' मानण्यासाठी ते आवश्यक वैशिष्ट्य आहे का या संदर्भात, अपीलकर्त्यांनी असा युक्तिवाद के ला की 'टेरिफ आयटम ८४७१ ३० १०' फक्त लॅ पटॉप/नोटबुकसाठी लागू आहे आणि ते लागू उपशीर्षक एच एस एन ने सूचित के ले आहे. त्याचा संबं धित भाग खालीलप्रमाणे आहे. “उपशीर्षक ८४७१.३० या उपशीर्षकामध्ये १० किलोपेक्षा जास्त वजन नसलेल्या पोर्टेबल स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग यंत्राचा समावेश आहे. ही यंत्रे, जी सपाट स्क्रीनने सुसज्ज आहेत, विद्युत उर्जेच्या बाह्य स्रोताशिवाय कार्य करण्यास सक्षम असू शकतात आणि बऱ्याच प्रसंगी नेटवर्क शी दुवा स्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे मॉडेम किं वा इतर माध्यमे असतात." (भर दिला ) १२. एच एस एन सामान्यत: प्रथम अनुसूची अंतर्गत वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी एक सुरक्षित मार्गदर्शक म्हणून मानावे लागेल कारण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त 'सुसंगत नामकरण 5 वर आधारित आहे, परंतु उपशीर्षकास लागू असलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपेचे बारकाईने वाचन के ल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की कोणत्याही बाह्य शक्तीस्त्रोताशिवाय कार्यक्षम होण्यासाठी कोणतीही अनिवार्य अट नाही. अशा प्रकारे आम्ही अपीलकर्त्यांशी सहमत होऊ शकत नाही की के वळ बिल्ट-इन पॉवर स्त्रोत असलेल्या ए डी पी ना 'टॅरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत वर्गीकृ त करणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत, संबं धित वस्तूंचे 'पोर्टेबल' म्हणून वर्गीकरण करण्याच्या हेतूने 'कार्यक्षमता' या कोणत्याही घटकाचा विचार के ला जात नाही. १३. दुसरा पैलू म्हणजे संबं धित वस्तूंचे 'पोर्टेबल' म्हणून वर्गीकरण करण्यासाठी के वळ १० किलोपेक्षा कमी वजनाचे तथ्य पुरेसे ठरेल की नाही, हा प्रश्न आहे. या संदर्भात, असे दिसून येते की सी ई एस टी ए टी च्या वादग्रस्त निर्णयात शब्दकोशातील 'पोर्टेबल' ची व्याख्या, "जे सहज वाहून नेली जाऊ शकते, आणि एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थिर के लेली नसते, " अशी के ली आहे. त्यानंतर पुढे असा निष्कर्ष निघाला की संबं धित वस्तूंची परिमाणे ( आकारमान ) 5 कलेक्टर ऑफ सेंट्रल एक्साइज, शिलॉंग विरुद्ध वुड क्राफ्ट प्रॉडक्ट्स लिमिटेड (१९९५) ३ एस सी सी ४५४ वर विचारात घेतली जाणारी बाब नाही, जोपर्यंत ती वस्तू सहजपणे उचलली जाऊ शकते आणि हलवली जाऊ शकते. वर नमूद के ल्याप्रमाणे, असाच युक्तिवाद आमच्यासमोर प्रतिवादीच्या विद्वान वरिष्ठ वकिलांनी देखील के ला आहे. १४. सुरुवातीला, आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की निर्णय घेणार् या अधिकार् यांनी आपापल्या निष्कर्षाप्रत येत असताना, विशेषत: सीमाशुल्क आयुक्त (अपील) यांनी त्यांच्या निष्कर्षाला समर्थन देण्यासाठी विकिपीडियासारख्या ऑनलाइन स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर सं दर्भ दिला आहे. आम्ही या स्रोताची उपयुक्ततेची स्पष्टपणे कबुली देतो आणि जे जगभरातील ज्ञानाचा विनामूल्य साठा प्रदान करतात, परंतु आम्ही कायदेशीर विवाद निराकरणासाठी अशा स्त्रोतांचा वापर करण्यापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही असे म्हणतो कारण हे स्रोत, ज्ञानाचा खजिना असूनही, क्राउडसोर्स ( आम जनतेच्या ज्ञानाचा स्रोत ) के लेल्या आणि वापरकर्त्याने व्युत्पन्न के लेल्या सं पादन मॉडेलवर आधारित आहेत आणि जे शैक्षणिक सत्यतेच्या दृष्टीने पूर्णपणे विश्वासार्ह नाही आणि या न्यायालयाने मागील प्रसं 6 नमूद के ल्याप्रमाणे त्यामध्ये दिशाभूल करणारी माहिती देखील असू शकते. म्हणून न्यायालये आणि अभिनिर्णय प्राधिकाऱ्यानी ( न्यायनिर्णय अधिकाऱ्यांनी ) वकिलांना, अधिक विश्वासार्ह आणि अस्सल स्त्रोतांवर, अवलंबून राहण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न के ला पाहिजे. 6कस्टम्स आयुक्त, बं गलोर विरुद्ध एसर इंडिया (पी) लिमिटेड (२००८) १ एससीसी ३८२, परी १७. १५. पुढे जाऊन, आपण आता हातात असलेल्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे, म्हणजे 'पोर्टेबल' शब्दाचा अर्थ आणि त्याहीपेक्षा जेव्हा सीईएसटीएटीचा तर्क के वळ वजनाच्या पैलूवर अवलंबून आहे. असा दृष्टिकोन स्पष्टपणे चुकीचा आहे कारण कायद्यानुसार 'पोर्टेबल'ची व्याख्या के ली गेली नसली तरी ती 'सबहेडिंग ८४७१ ३०' मध्ये समाविष्ट करण्यात आली होती आणि त्याआधी एकच ‘ ’ समाविष्ट करण्यात आली होती, - याचा अर्थ असा होता की त्याअंतर्गत वस्तूंचे वर्गीकरण 'हेडिंग ८४७१'चे उपवर्गीकरण म्हणून घेतले जाईल. १६. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर शब्दकोशाच्या अर्थावर अवलंबून न राहता 'पोर्टेबल'ची व्याख्या ए डी पी च्या सं दर्भात करायला हवी होती जे या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सी सी ई विरुद्ध कृ ष्णा कार्बन पेपर कं.[7] मध्ये नमूद आहे. पहिल्या अनुसूचीतील कोणत्याही नोंदीच्या संदर्भात एखाद्या शब्दाची व्याख्या करायची असेल तर कोणता योग्य दृष्टिकोन घ्यावा, हेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या न्यायालयाच्या निर्णयानुसार ते पुढीलप्रमाणे आहे - “ १०. व्यापार याचा अर्थ असा आहे कि जो त्या विशिष्ट व्यापारात प्रचलित आहे, जिथे वस्तू ज्ञात आहे किं वा व्यापार के ला जातो. जर विशिष्ट प्रकारचा माल वित्तीय प्रवेशाचा विषय असेल तर तो प्रवेश त्या विशिष्ट व्यापाराच्या संदर्भात, तो विशिष्ट शब्द लक्षात घेऊन समजून घेतला पाहिजे. तथापि, जिथे कोणत्याही प्रकारे पुरावा नसेल तर विशिष्ट वेळी विशिष्ट कायद्यातून 7 सीसीई विरुद्ध कृ ष्णा कार्बन पेपर कं पनी (१९८९ 9) 1 १५० एससीसी, पॅरा ६. ८. दिलेली व्याख्या आणि त्याखालील अर्थ (एसआयसी) ही निर्णायक परीक्षा असेल..[8] १७. आमच्या मते 'पोर्टेबल' या शब्दाचा अर्थ ए डी पी च्या संदर्भात लावायला हवा होता. या संदर्भात, संबं धित तांत्रिक व व्यावसायिक साहित्याचा अभ्यास आम्ही के ला आहे. त्याचे सूक्ष्म विश्लेषण के ल्यावर खालील संबं धित विवेचन करणे आम्हाला योग्य वाटते:: इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक् ट्रॉनिक् स इंजिनीअर्स 'पोर्टेबल कॉम्प्युटर' ची व्याख्या खालील प्रमाणे - ' वैयक्तिक सं गणक म्हणजे एक असा नग कि ज्याची बांधणी अशी असते कि जो सहजतेने वागवणे आणि इकडून तिकडे सोबत नेणे शक्य असते.[9] कॉम्प्युटर आणि इंटरनेट च्या डिक्श्नरीनुसार त्याची व्याख्या अशी के ली आहे. - “आजूबाजूला वाहून नेण्यात सक्षम”. पोर्टेबल कॉम्प्युटर हा लॅ पटॉप कॉम्प्युटरपेक्षा मोठा असतो, परंतु तरीही तो सहज हलवता येतो”10 ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटरच्या संदर्भात 'पोर्टेबल', अशी व्याख्या करते, - “एक सं गणक जो एका व्यक्तीद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेला जाऊ शकतो. तो प्रवासामध्ये वापरला जाऊ शकत नाही. उदाहरणांमध्ये लॅ पटॉप संगणक 8 आय बी आय डी, परिच्छे द १० 9 द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स, आय इ इ स्टँडर्ड कॉम्प्युटर डिक्शनरी (१९९०) १५५. 10डाउनिंग आणि इतर, डिक्शनरी ऑफ कॉम्प्युटर अँड इंटरनेट टर्म्स (10 वी आवृत्ती, बॅ रॉनची शैक्षणिक मालिका २००९) ३७४. समाविष्ट आहेत. ”11 मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर डिक्शनरी विविध प्रकारच्या 'पोर्टेबल कॉम्प्युटर'चे चित्रण करणार् या सचित्र तक्त्यासह एक व्याख्या देखील प्रदान करते –“कोणताही संगणक सहजपणे हलवण्याकरिता बांधणी के लेला आहे. पोर्टेबल सं गणक आकार आणि वजनाने वैशिष्ट्यीकृ त के ले जाऊ शकतात.” 12 प्रकार अंदाजे वजन विद्युत स्त्रोत टिपण्णी ने आण करण्या जोगा १५ ते ३० पाउं ड घरगुती विदुयत प्रवाह कधी कधी त्याला ने आण करण्या जोगा असे म्हणतात; सामान्यत: त्याला फ्लॉपी ड्राईव्ह असते, हार्ड ड्राइव्ह; मानक सीआरटी पडदा असतो लॅ पटॉप ८ ते १५ पाउं ड घरगुती विदुयत प्रवाह किं वा बॅ टरी मांडीवर ठेवता येतो, त्याला फ्लॉपी ड्राईव्ह असते सपाट एलसीडी किं वा प्लाझ्मा 11 अँड्र्यू बटरफील्ड आणि जेरार्ड एके म्बे एनगोंडी (एडीएस), ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ कॉम्प्युटर सायन्स (७ वी आवृत्ती, ओयूपी २०१६). 12अॅ लेक्स ब्लँ टन (एड), मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर डिक्शनरी (५ वी आवृत्ती, २००२) ४१२४१३. अल्ट्रा लाइट ( अति हलका ) २ - ८ पाउं ड बॅ टरी किं वा ट्रान्सफॉर्मर ब्रीफके स मध्येसुद्धा वाहून नेणे सोपे कधीकधी फ्लॉपी किं वा हार्ड ड्राइव्ह हा रॅम ड्राइव्ह किं वा ईपीआरओएम ऐवजी वापरतात; पातळ मॉडेल्स नोटबुक संगणक म्हणून ओळखले जातात हॅन्ड हेल्ड ( हातात धरण्या जोगा ) २ पाउं ड पेक्षा कमी बॅ टरी किं वा ट्रान्सफॉर्मर पामटॉप किं वा तळहाताएवढ्या आकाराचे ते असतात आणि ते एका हातातच धरण्याजोगे असतात १८. संबं धित सामग्री आणि इनपुट्सच्या एकत्रित वाचनावर, हे अगदी स्पष्ट आहे की पोर्टेबिलिटीचे तथ्य निश्चित करण्यासाठी वजन हा एकमेव घटक असू शकत नाही. त्याऐवजी, ए डी पी 'पोर्टेबल' आहे की नाही हे तार्कि करित्या स्थापित करण्यासाठी आणि त्याची दुहेरी घडी होते का, हे पाहणे गरजेचे आहे. पहिला घटक म्हणजे त्यांची सहजपणे वाहून नेण्याची क्षमता, ज्यामध्ये वजन आणि त्याचा आकार यासारख्या सर्व पैलूंचा समावेश आहे. योग्य प्रकारामध्ये, या मूल्यांकनात माउं टेड स्टँड किं वा कोणत्याही पॉवर अॅ डॉप्टरसारख्या सुरक्षित आणि कार्यक्षम वापरासाठी आवश्यक असलेल्या जोडण्या विचारात घेतल्या जातील. दुसरा घटक म्हणजे ए डी पी ग्राहकाच्या दैनंदिन वाहतुकीसाठी योग्य असणे आवश्यक आहे आणि त्यात वारंवार ये-जा सहन करण्यासाठी टिकाऊपणा आणि नुकसान होण्यापासून बचावाची योग्यता, यासारख्या बाबींचा समावेश असेल. याचे एक उदाहरण म्हणजे संरक्षण आणि बचाव यासाठी पेटीची उपलब्धता आहे काय आणि जे वापरकर्त्यांना ए डी पी हातात घेऊन जाण्याजोगे आहे काय किं वा सामान्य ब्रीफके स किं वा खांद्याच्या पिशवीत ते घेऊन जाण्याजोगे आहे काय. १९. संबं धित वस्तूंच्या वैशिष्ट्यांमध्ये हे मुख्य घटक लागू के ल्यावर, ते 'पोर्टेबल' नाहीत अशी शंका घेण्यास जागा नाही. प्रथम, संबं धित वस्तूंचे आकारमान दैनंदिन ने - आण करण्यासाठी अतार्कि क आणि अव्यवहार्य बनवतात. मालाचे वर्गीकरण सहसा निर्मात्याच्या जाहिरातींच्या सामग्रीवर के ले जाऊ नये, हे खरे असले, तरी, आमच्यासमोर सादर के लेले वापरकर्ता मार्गदर्शक पुस्तिका असे दर्शविते की उत्पादनाला निर्दिष्ट अभिमुखता सोडून इतर ठिकाणी ठेवल्याने संबं धित वस्तूंचे नुकसान होऊ शकते. वापरकर्ता मार्गदर्शक पुस्तिका, हे देखील स्पष्टपणे अधोरेखित करतात की संबं धित वस्तू एका निश्चित ठिकाणी ठेऊन वापरायच्या होत्या आणि त्यात विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ते भिंतीवर बसवण्याकरता एक आदर्श उत्पादन आहे. २०. दुसरे म्हणजे, कोणत्याही संरक्षणात्मक के स ( पेटी ) किं वा कोणत्याही कव्हरिंग बॅ ग नसताना या वस्तू जवळ बाळगण्यास ग्राहकाची असमर्थता दर्शविते आणि ने आण करावयाच्या दरम्यान संबं धित वस्तूंच्या नुकसानीची शक्यता त्याला असुरक्षित बनवते. आमच्या आधी विसंबून असलेल्या विवेचनात नमूद के ल्याप्रमाणे, 'पोर्टेबल' मानल्या जाण्यासाठी वजन हा एकमेव विचार नव्हता. उदाहरणार्थ, पूर्वी असे संगणक होते जे आता सामान्य वापरात नाहीत जे 'वाहून नेण्याजोगे किं वा सोबत बाळगण्याजोगे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे वजन १० किलोग्रॅमपेक्षा जास्त होते. पूर्वीचे लॅ पटॉप हे पोर्टेबल असण्यासाठी डिझाइन के ले गेले होते आणि एका हॅण्डल असणाऱ्या बॉक्समध्ये सुबकपणे घडी घालून ठेवले जाऊ शकत होते. त्यांचे वजन आणि आकार लहान सुटके सशी तुलना करता येण्याजोगा असूनही, वॅ गन ( पेटी ) शिवाय त्यांची वाहतूक के ली जाऊ शकत होती. २१. शिवाय, तंत्रज्ञानातील प्रगतीचा कायद्यावर होणारा परिणाम अधोरेखित करण्यासाठीही आपण या सं धीचा उपयोग के ला पाहिजे. पहिल्या अनुसूचीतील संबं धित नोंदी अंमलात आल्या, तेव्हा कोणताही ए डी पी 'पोर्टेबल' आहे की नाही हे ठरविण्यासाठी वजन हा नक्कीच महत्त्वाचा निकष होता, ही वस्तुस्थिती आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे ए डी पी च्या संदर्भात उच्च कार्यक्षमतेशी संबं धित वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. एल ई डी तंत्रज्ञान, वेगवान मायक्रोचिप्स इत्यादींच्या आगमनामुळे मोबाइल फोनमध्ये परफॉर्मन्स स्पेसिफिके शन्स असणे शक्य झाले आहे, जे के वळ दशकभरापूर्वी के वळ उच्च दर्जाच्या लॅ पटॉपवरच शक्य होते, यात नवल नाही. त्यामुळे ग्राहकाच्या कोणत्याही वस्तू किं वा व्यापारा विषयीच्या आकलनावर अशा प्रकारचा परिणाम होतो, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. २२. ए डी पी च्या व्यापारात वापरल्या जाणाऱ्या सामान्य भाषेत समजलेल्या 'पोर्टेबल' या घटकाखाली मोडण्यासाठी आपण असे मानले पाहिजे की संबं धित वस्तू पोर्टेबल नाहीत कारण - प्रथम, संबं धित वस्तूंचे कर्णरेषा आकारमान कमीतकमी 18.[5] इंच लांबीचे आहे आणि ते वीज के बलसह बाळगणे आवश्यक आहे तसेच बहुतेक प्रकारामध्ये योग्य स्टँडसह बसवायचे आहे आणि; दुसरं म्हणजे या संबं धित वस्तूंच्या दैनंदिन ने - आण करण्यासाठी बाजारात कोणतेही संरक्षक आवरण किं वा पेटी उपलब्ध नाही. अशा आवश्यकतांमुळे दैनंदिन वाहतुकीदरम्यान संबं धित वस्तू सहजपणे वाहून नेणे अशक्य होते. त्यामुळे संबं धित वस्तू 'पोर्टेबल' नाहीत, असे आमचे मत आहे. २३. हे सांगण्याची आवश्यकता नाही की सीमाशुल्क अधिकार् यांना मालाचे वेगळ्या प्रकारे वर्गीकरण करायचे असल्याने, ते दाखविण्यासाठी पुरावा देण्याचा भार त्यांच्यावर होता, ज्याची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले.13 त्यामुळे प्रचलित स्व-मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत, अपीलकर्त्यांनी सादर के लेले वर्गीकरण स्वीकारले पाहिजे. निष्कर्ष २४. वर नमूद के लेल्या चर्चेच्या अनुषं गाने, आम्ही अपीलास मान्यता देतो आणि संबं धित वस्तूंचे 'टेरिफ आयटम ८४७१ ३० १०' अंतर्गत वर्गीकरण करणारे वादग्रस्त आदेश रद्द करतो. असे 13 डाबर इंडिया लिमिटेड विरुद्ध सीसीई, जमशेदपूर (२००५) ४ एस सी सी ९ आदेश देण्यात येतात कि सुरुवातीला 'टॅरिफ आयटम 8471 50 00' शुल्क आकारणीसाठी संबं धित वस्तूंचे मूल्यमापन सुरुवातीला जाहीर के लेल्या 'टॅरिफ आयटम ८४७१ ५० ००' अंतर्गत निश्चित करावे, सर्व आवश्यक परिणामांचे पालन के ले जाईल. २५. वरील दृष्टिकोनातून सर्व प्रलंबित असणाऱ्या अर्जांसह अपीले निकाली काढण्यात आलेली आहेत. (सूर्य कांत) ………………………….. न्या. (विक्रम नाथ) ………………………….. न्या. नवी दिल्ली दिनांक: १७.०१.२०२३ x-x-x-x अस्वीकरण या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या/ तिच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित राहील आणि त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता येणार नाही तसेच इंग्रजी भाषेतील न्यायनिर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि अंमलबजावणी करता वैध मानला जाईल. x-x-x-x