S. M. Pasha v. Maharashtra State

Supreme Court of India · 17 Feb 2023
M. R. Shah; C. T. Ravikumar; Sanjay Karol
Special Leave Petition (Civil) No. 4428 of 2016
civil appeal_allowed Significant

AI Summary

The Supreme Court permitted withdrawal of the Special Leave Petition following termination of the earlier development agreement and directed disclosure of the new agreement to tenants, allowing all parties to challenge agreements before appropriate forums.

Full Text
Translation output
प्रकाशनयोग्य
भारताचे सर्वोच्च न्यायालयात
दिवाणी अपिलीय अधिकारीता
विशेष अनुमती याचिका ( दिवाणी) क्र. ४४२८/२०१६
एस.एम. पाशा आणि इतर…. याचिकाकर्ते
विरुद्ध
महाराष्ट्र राज्य आणि इतर. ……उत्तरवादी
सह
विशेष अनुमती याचिका (दि) क्र…सीसी क्र. ४९२२/२०१६
आदेश
एम.आर .शहा - न्यायमूर्ती
१. मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अधिकारतेमधील रिट याचिका क्र. ६१४२/२०१४ आणि रिट याचिका
क्र.५४९०/२०१४, मध्ये दिलेल्या आक्षेपित न्यायनिर्णय
आणि आदेशाने नाराज आणि असमाधानी झाल्यामुळे, प्रश्नाधीन जागेत असलेल्या काही भाडेकरू
ं नी, सदरच्या विशेष अनुमती याचिका (एसएलपी) दाखल क
े ल्या आहेत.
२. डॉ. ए.एम. सिंघवी, विद्वान वरिष्ठ वकील, हे याचिकाकर्त्यांच्या वतीने (याचिकाकर्ते ४ वगळता) विशेष
अनुमती याचिका (दि) क्र. ४४२८/२०१६ मध्ये हजर झाले आहेत. श्री. राणा मुखर्जी, विद्वान वरिष्ठ
वकील, हे याचिकाकर्त्यांच्या वतीने विशेष अनुमती याचिका(दि) क्र…. सीसी क्र. ४९२२/ २०१६ मध्ये
हजर झाले आहेत. श्री. ध्रुव मेहता, विद्वान वरिष्ठ वकील, हे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या वतीने हजर झाले
आहेत. श्री. नीरज किशन कौल, विद्वान वरिष्ठ वकील, हे विशेष अनुमती याचिका (दि) क्र. ४४२८/२०१६
मध्ये उत्तरवादी क्र. ५ मुख्य प्रतिस्पर्धी उत्तरवादीच्या वतीने हजर झाले आहेत. श्री. वेणुगोपाल, विद्वान
वरिष्ठ वकील, हे उत्तरवादी क्र. १७ च्या वतीने हजर झाले आहेत. श्री. गुरुक
ृ ष्ण क
ु मार, विद्वान वरिष्ठ
वकील, हे उत्तरवादी क्र. १६ च्या वतीने हजर झाले आहेत आणि श्री संजय जैन, विद्वान अतिरिक्त
महाधिवक्ता, हे महाराष्ट्र राज्य /म्हाडा च्यावतीने हजर झाले आहेत.
३. उत्तरवादी क्र.५ च्या वतीने खोट्या साक्षीसाठी दोन आयए (वादकालीन अर्ज) दाखल क
े ले आहेत.
उत्तरवादी क्र. ५ च्या वतीने एक आयए दाखल क
े ला आहे, ज्यात विकास करार जो त्यांच्या बाजूने होता तो
संपुष्टात आणण्याला आव्हान दिले आहे.
३.१ डॉ. ए.एम. सिंघवी, विद्वान वरिष्ठ वकील, यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने विशेष अनुमती याचिका (दि)
क्र. ४४२८/२०१६ मध्ये उपस्थित राहून, अशी विनंती क
े ली की, यानंतरच्या घडामोडी लक्षात घेऊन
याचिकाकर्त्यांना (याचिकाकर्ते क्र. ४ वगळता), विशेष अनुमती याचिका मागे घेण्याची परवानगी देण्यात
यावी. म्हणणे मांडण्यात आले आहे की, त्यानंतरच्या घडामोडी आयए क्र. १२८८८१/२०१९ मध्ये नमूद

े ल्या आहेत. असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, सध्याच्या प्रलंबित कार्यवाहीच्या दरम्यान, उत्तरवादी क्र. ५ च्या बाजूने असलेला विकास करार ०८.१०.२०१८ रोजी संपुष्टात आणण्यात आला आहे
आणि नवीन विकासकाची नियुक्ती झाल्याने दुसऱ्या विकासकाच्या बाजूने नवा विकास करारही करण्यात
आला आहे. पुढे असेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे की,त्यानंतर सुद्धा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि
क्षेत्र विकास प्राधिकरण ( म्हाडा) यांनी सुद्धा विकास करार संपुष्टात आणलेला आहे, जो उत्तरवादी क्र. ५
यांच्या बाजूने होता. असे म्हणणे मांडण्यात आले आहे की, बदललेल्या परिस्थितीत वादमुद्दा जो अशाप्रकारे
उत्तरवादी क्र. ५ यांच्या विरुद्ध होता, तो टिकत नाही आणि म्हणून अशी विनंती करण्यात आली आहे की
विशेष अनुमती याचिका (सी) क्र. ४४२८/२०१६ मागे घेण्याची परवानगी देण्यात यावी.
३.२ श्री राणा मुखर्जी, याचिकाकर्त्याच्या वतीने विशेष अनुमती याचिका (दि) क्र…सीसी क्र.
४९२२/२०१६ मध्ये हजर असलेले विद्वान वरिष्ठ वकील, वरील म्हणणे नाकारीत नाहीत तथापि, त्यांनी
असे म्हणणे मांडले आहे की, या विशेष अनुमती याचिक
े मधील भाडेकरू आणि/किंवा याचिकाकर्त्यांचा
विचार करता, त्यांना नवीन विकास करारातील आशय आणि/किंवा अटी व शर्तींची माहिती नाही आणि
म्हणून विद्यमान व्यवस्थापनाला, नवीन विकासकांच्या बाजूने क
े लेल्या नव्या विकास कराराची प्रत सादर
करण्यास आदेशित करण्यात यावे यावेत, जेणेकरुन त्यांना कळू शक
े ल की नवीन विकास करार कोणत्या
अटी व शर्तींवर क
े ला गेला आहे आणि भाडेकरू त्यावर सहमत आहेत की नाहीत. त्यांनी अशी विनंती क
े ली
की, जर याचिकाकर्ते नवीन क
े लेल्या विकास करारातील अटी आणि शर्तींशी सहमत नसतील तर, त्यांना
नवीन विकास करारास योग्य न्यायालय/ मंच समोर आव्हान देण्याची त्यांच्या बाजूने मुभा देण्यात यावी.
३.३ श्री. नीरज किशन कौल, विद्वान वरिष्ठ वकील प्रतिवादी क्र. ५ च्या वतीने हजर असलेले, यांचा सदरची
विशेष अनुमती याचिका मागे घेण्यास विरोध असला तरीही त्यांनी असे म्हणणे मांडले आहे की, उत्तरवादी
क्र. ५ यांनी आयए च्या मार्गाने विकास करार जो त्यांच्या बाजूने होता तो संपुष्टात आणण्यास, आव्हान दिले
आहे आणि खोटी साक्षीची कार्यवाही देखील सुरू क
े ली आहे. त्यांनी अशी विनंती क
े ली आहे की, जर हे
न्यायालय उत्तरवादी क्र. ५ ला सध्याच्या कार्यवाहीमध्ये, उत्तरवादी क्रमांक ५ चा विकास करार संपुष्टात
आणण्याला आव्हान देण्यासाठी परवानगी देण्यास इच्छ
ु क नसेल आणि खोट्या साक्षी अर्जावर विचार करत
नसेल, तर उत्तरवादी क्र. ५ यास विकास करार संपुष्टात आणण्यास आणि दुसऱ्या विकासकाच्या बाजूने
असलेला नंतरचा विकास करार यास योग्य न्यायालय/मंचा समोर आव्हान देण्यास, उत्तरवादी क्र. ५ यांच्या
बाजूने मुभा देण्यात यावी आणि खोट्या साक्षी अर्जामध्ये नमूद क
े लेली कारणे कायद्याप्रमाणे आणि त्याच्या
स्वतःच्या गुणवत्तेनुसार विचारात घेण्यासाठी आदेशित करण्यात यावे.
४. संबंधित पक्षांच्या वतीने उपस्थित असलेले विद्वान वरिष्ठ वकील/सल्लागार यांचे म्हणणे ऐक
ू न आणि
आयए क्रमांक १२८८८१/२०१९ मध्ये नमूद क
े लेल्या आणि निदर्शनास आणून दिलेल्या नंतरच्या घडामोडी
विचारात घेऊन, खाली क
े लेल्या निरीक्षणाप्रमाणे सुरू करावयाच्या कार्यवाहीतील संबंधित पक्षांचे हक्क आणि
म्हणणे यांना बगल न देता आणि डॉ. ए.एम. सिंघवी, विद्वान वरिष्ठ वकील यांनी क
े लेल्या विनंतीचा विचार
करून, आम्ही याचिकाकर्त्यांना विशेष अनुमती याचिका (दि) क्र. ४४२८/२०१६ मधील विशेष अनुमती
याचिका बिनशर्त मागे घेण्याची परवानगी देत आहोत. याचिकाकर्ता क्र.४ चा विचार करता, कोणीही हजर
झालेले नाही. त्यानंतरच्या घडामोडी आणि अन्यथा सुद्धा कोणीही उपस्थित राहिलेले नाही हे विचारात
घेता, सध्याची विशेष अनुमती याचिका फ
े टाळण्यात आली आहे, जेथे विशेष अनुमती याचिका (सी) क्र.
४४२८/२०१६ मध्ये याचिकाकर्ते क्र. ४ आहेत.
विशेष अनुमती याचिका (दि)....सीसी क्र. ४९२२/२०१६
विलंब माफ. बदली अर्ज मंजूर करण्यात आले आहेत आणि संबंधित याचिकाकर्त्यांच्या कायदेशीर वारसांची
नावे रेकॉर्डवर घेण्यात आली आहेत आणि पक्षकारांच्या मेमोमध्ये त्याप्रमाणे सुधारणा करण्यात यावी. ५.
विशेष अनुमती याचिका (दि) क्र…. सीसी क्र. ४९२२/२०१६ खालीलप्रमाणे निकाली काढण्यात आली
आहे :-
(i) या न्यायालयाने विकास करार संपुष्टात आणण्याचा ,जो उत्तरवादी क्र. ५ च्या बाजूने होता आणि नवीन
विकास करार अंमलात आणला जात आहे/क
े ला जात आहे याची नोंद घेतली आहे. विद्यमान व्यवस्थापनाने
नवीन विकास कराराची प्रत संबंधित भाडेकरू
ं ना देणे गरजेचे आहे. जर भाडेकरू
ं पैकी कोणताही भाडेकरू
नवीन विकास कराराच्या अटी व शर्तीं बाबत असमाधानी असेल, तर त्यांच्यासाठी कायद्यानुसार आणि
स्वतःच्या गुणवत्तेनुसार विचारात घेतलेल्या योग्य न्यायालय /मंच समोर आव्हान देण्याची मुभा असेल;
(ii) उत्तरवादी क्र. ५, च्या बाजूने असलेला विकास करार विद्यमान व्यवस्थापन/ म्हाडा यांनी संपुष्टात
आणला, त्या संदर्भात त्यांना सदर विकास करार संपुष्टात आणण्याच्या आणि अमलात येत असलेला
नवीन विकास करार यास योग्य न्यायालय /मंच समोर आव्हान देण्याचीही मुभा असेल आणि खोटी साक्षी
अर्जामध्ये नमूद क
े लेली कारणे कायद्यानुसार आणि स्वतःच्या गुणवत्तेनुसार विचारात घेण्यात यावीत.
६. सध्याची विशेष अनुमती याचिका (दि) क्र. ४४२८/२०१६ वरील बाबींनुसार आणि वरील निरीक्षणांसह
मागे घेण्यात आली म्हणून फ
े टाळण्यात आली आहे आणि विशेष अनुमती याचिका (दि) क्र… सीसी क्र.
४९२२/२०१६ देखील वरील बाबींनुसार आणि निरीक्षणासह निकाली काढण्यात आली आहे.
७. प्रलंबित अर्ज, जर काही असतील, तर ते निकाली काढले जातील.
(एम. आर. शाह) ……… ..न्यायमूर्ती
(सी.टी. रविक
ु मार)…. न्यायमूर्ती
(संजय करोल).............न्यायमूर्ती
नवी दिल्ली, १७ फ
े ब्रुवारी, २०२३..
XXXXXX
अस्वीकरण
या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या/ तिच्या मातृभाषेमध्ये
त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित राहील आणि त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता
येणार नाही. तसेच इंग्रजी भाषेतील न्यायनिर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता
विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि अंमलबजावणीकरीता वैद्य मानला जाईल.
XXXXXX
JUDGMENT