Premchand v. Maharashtra State

Supreme Court of India · 03 Mar 2023
S. Ravindra Bhat; Dipankar Datta
Criminal Appeal No. 211 of 2023
criminal appeal_allowed Significant

AI Summary

The Supreme Court modified a murder conviction to culpable homicide not amounting to murder under Exception 4 to Section 300 IPC, emphasizing the accused's right to explain under Section 313 CrPC and the absence of premeditation.

Full Text
Translation output
(इंग्रजीमध्ये टंकलिखित न्यायनिर्णयाचे मराठीत भाषांतर)
अहवाल करण्यायोग्य
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात
फौजदारी अपील अधिकार क्षेत्र
२०२३ चे फौजदारी अपील क्रमांक २११
प्रेमचंद ......अपीलार्थी
वि.स.

महाराष्ट्र राज्य ...उत्तरवादी
न्यायनिर्णय
दिपंकर दत्ता, जे.
१. हे अपील, विशेष विनंतीद्वारे, ०६ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या मुंबई येथील उच्च
न्यायालयाच्या न्यायिधीकरणाच्या, नागपूर येथील खंडपीठाच्या निकालावर आणि
आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करते, ज्याद्वारे फौजदारी अपील क्रमांक २११/२०१६
मधील भारतीय दंड संहिता, १८६० ( “
संक्षिप्त भा. दं . वि. सं. ” साठी) चे कलम
३०२ अन्वये फर्मावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा व रु. ६,०००.०० दंड आणि दंड
ना भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा तसेच कलम ३०७ भा. दं . वि. सं. अंतर्गत
दंडनीय गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि रु. ४,०००.०० दंड या
शिक्षेविरुद्ध अपीलकर्त्याने क
े लेले अपील फ
े टाळण्यात आले.
२. फिर्यादी खटला असा होता की, अपीलकर्त्याने २६ सप्टेंबर २०१३ रोजी
सायंकाळी ५:०० वाजता नंदकिशोर कोरडे (संक्षिप्ततेसाठी 'पीडित') याचा खून क
े ला
होता. नामदेव कोरडे ( फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.२), विलास चरडे ( फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र.३), आणि क
ु णाल बाभुळकर ( फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.४) या अन्य
तिघांना चाक
ू ने वार क
े ल्यामुळे ज्या जखमा आहेत त्या अपीलकर्त्याने क
े ल्या आहेत, त्यानंतर लगेचच बळीताची आई रेखाबाई कोरडे, (फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.१), हिने तक्रार दाखल क
े ली, त्यानुसार कलम ३०२ आणि ३०७, भा. दं. वि. सं. अंतर्गत
एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दि. २७ सप्टेंबर, २०१३ रोजीच्या पोस्टमॉर्टम
अहवालात (निशाणी ३५) मृत्यूचे संभाव्य कारण म्हणून पीडिताच्या "मानेला झालेली
जखम" नोंदवली गेली.
३. एफआयआर नोंदविल्यानंतर, पोलीस निरीक्षक भरत ठाकरे (फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. ८) यांनी तपास हाती घेतला, घटनास्थळी भेट दिली आणि
घटनास्थळाचा पंचनामा तयार क
े ला. त्याला घटनास्थळ रक्ताने माखलेले आढळून
आले आणि त्यांनी तेथून रक्ताने माखलेला चाक
ू , रक्ताने माखलेली लाकडी काठी, तीन
जोड्या चप्पला, दोन चष्मे आणि एक निळा डॉट पेन जप्त क
े ला. फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. ८ ने अपीलकर्त्याला अटक क
े ली आणि त्यालाही दुखापत झाली
असल्याने त्याला त्याचा वैद्यकीय तपासणीसाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात
पाठवण्यात आले.
४. तपास पूर्ण झाल्यावर, कलम ३०२ आणि ३०७, भा. दं . वि. सं. अंतर्गत एक
आरोपपत्र अपीलकर्त्याविरुद्ध संबंधित न्यायालयासमोर दाखल करण्यात आले.
खटला सुपूर्द क
े ल्यावर, वरील गुन्ह्यांसाठी आरोप निश्चित क
े ले गेले ज्यात
अपीलकर्त्याने दोषी नसल्याची कबुली दिली आणि खटला चालवण्याची विनंती

े ली.
५. खटल्याच्या समर्थनार्थ फिर्यादी पक्षाने ८ (आठ) साक्षीदार तपासले. बचाव
पक्षाच्या वतीने कोणाचीही तपासणी करण्यात आली नाही. तथापि, अपीलकर्त्याने एक
लेखी जबाब दाखल क
े ला, ज्याचा संदर्भ आम्ही या निकालाच्या नंतरच्या भागात
निर्देशित करतो. अपीलकर्त्याला दोषी ठरवण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुख्यत्वे
फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २, फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ३ आणि फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र.४ च्या जबाबावर अवलंबून होते. न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की
अपीलकर्त्याने चाक
ू ने बळीताचा खून क
े ला (मुद्देमाल क्र. १) आणि फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. २, फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.३ आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ४
यांचा खून करण्याचा प्रयत्नही क
े ला. अपीलकर्त्याचा बचाव खोटा असल्याचे कोर्टात
दिसून आले आणि फिर्यादीने त्याची क
े स वाजवी संशयापलीकडे सिद्ध क
े ली असे
मानले गेले. यानंतर वरीलप्रमाणे दोष सिद्ध झाल्याचे नमूद करून शिक्षा सुनावण्यात
आली होती.
६. उपरोक्त न्यायनिर्णयाला उच्च न्यायालयासमोर आव्हान देण्यात आले नंतर संबंधित
विभागीय खंडपीठाचे मत असे होते की सादर न्यायनिर्णयात काढलेले निष्कर्षामध्ये
हस्तक्षेप करूनही काही वेगळा निष्कर्ष काढता येईल याची खात्री देता येत नाही तसेच
अपील हे गुणवत्ता विरहित आहे, म्हणून ते फ
े टाळण्यात येत आहे.
७. अपीलकर्त्यासाठी विद्वान वकिलांनी क
े लेल्या युक्तिवादाचा पहिला भाग म्हणजे
खालील न्यायालयांनी अपीलकर्त्याला दोषी ठरवण्यात स्पष्टपणे चूक क
े ली. त्यांच्या
मते, खालील मुद्दे विचारात घेण्यास पात्र आहेत:
ए. प्रथमतः न्यायालयाने हे लक्षात घेतलेले नाही की घटनास्थळी उपस्थित असलेल्या
शंकरराव फरतोडे, उमराव चरडे, आणि रमेश कोरडे (फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २
च्या म्हणण्यानुसार) यापैकी कोणीही फिर्यादी पक्षाचे साक्षीदार म्हणून तपासले नाही.
न्यायालयांनी हे लक्षात घेतले पाहिजे होते की, त्यांना हजर क
े ले असते तर त्यांनी
फिर्यादीच्या खटल्याला पाठिंबा दिला नसता आणि म्हणून त्यांना अशा प्रकारे, मुद्दाम
रोखले गेले. त्यामुळे अशा स्वतंत्र साक्षीदारांची तपासणी न करणे ही बाब फिर्यादीच्या
खटल्यासाठी अत्यंत प्रतिक
ू ल धरली पाहिजे.
बी. दुसरे म्हणजे, अपीलकर्त्याचे वय लक्षात घेता (घटनेच्या तारखेला तो ५८ वर्षांचा
होता), हे अशक्य वाटते कि, तो बळीत व्यक्तीला आणि इतर जखमींना अगदी सहजपणे
चाक
ू ने जखमी करू शक
े ल तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी (शंकरराव
फरतोडे, उमराव चरडे आणि रमेश कोरडे) अपीलकर्त्याला इतराना दुखापत
करण्यापासून रोखण्याचा तसेच इतरांना वाचवण्याचा प्रयत्न क
े ला नव्हता.
सी तिसरे म्हणजे, या स्वतंत्र साक्षीदारांची तपासणी करून हे सिद्ध करणे आवश्यक
होते की, अपीलकर्ता हाच चाक
ू घेऊन आला होता आणि तो वार करत होता, परिणामी
बळीताचा मृत्यू झाला होता आणि इतरांना दुखापत झाली होती.
डी. चौथे, सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.२, फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. ३ आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ४) ज्यांनी अपीलकर्त्याविरुद्ध
साक्ष दिली ते हितसंबंधित साक्षीदार होते आणि म्हणून ते विश्वासार्ह नव्हते आणि
त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवला जाऊ नये.
इ. पाचवे, खालील न्यायालये हे लक्षात घेण्यात अयशस्वी ठरले की फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. २ आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ३ हे दोन्ही हितसंबंधित साक्षीदार
होते आणि वास्तविक घटनेचे मूळ वास्तव दाबून खोटया पद्धतीने गुंतवण्याचे स्पष्ट
प्रकरण होते.
एफ. सहावे, हे आश्चर्यकारक आहे की फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ४ ने
अपीलकर्त्याकडून चाक
ू हिसकावून घेतल्याचा दावा क
े ला असला तरी, त्याच्या
हाताला कोणतीही जखम नाही; याउलट, अपीलकर्त्याला झालेल्या सहा
दुखापतींबाबत फिर्यादीच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण नाही.
जी. सातवे, अपीलकर्त्याच्या इमारतीच्या तळमजल्यावर फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.
२ द्वारे क
े लेल्या अनधिक
ृ त बांधकामामुळे उद्भवलेल्या पक्षांमधील वाद सन २००३
पासून संबंधित असल्याने बळीत आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ यांच्यावर हल्ला
करण्याचा कोणताही हेतू सिद्ध क
े ला जाऊ शकला नाही.
एच. सातवे, भारतीय पुरावा कायदा, १८७२ च्या कलम २७ अंतर्गत अपीलकर्त्याच्या
सांगण्यावरून चाक
ू जप्त करण्यात आला नाही, परंतु घटनास्थळी जप्ती करण्यात
आल्याचे दिसून आले आहे. फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र.२ आणि फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र.४ ची परस्परविरोधी विधाने असल्याने, हाणामारीत चाक
ू कोणी आणला
हे अस्पष्ट आहे.
आय. शेवटी, अपीलकर्ता हा नागपूरचा कायमचा रहिवासी होता तर घटनेचे ठिकाण
काटोल, हे तहसील ठिकाण नागपुरातून सुमारे ५० किलोमीटरवर आहे. अपीलकर्त्याने
इतक
े अंतर प्रवास करून बळीताची हत्या करण्याचे आणि तेही दिवसाढवळ्या आणि
लोकांच्या उपस्थितीत चाक
ू ने वार करण्याचे कोणतेही कारण असू शकत नाही.
८. विद्वान वकिलांच्या युक्तिवादाचा दुसरा भाग असा आहे की बळीताचा मृत्यू
अपीलकर्त्याच्या हातून झाला असे गृहीत धरले तरी, फिर्यादीच्या खटल्यानुसार बळीत
सुरुवातीला घटनेच्या ठिकाणापासून दूर होता आणि तो शेवटी भांडणात सामील झाला
होता. अशाप्रकारे, अपीलकर्त्याची कोणतीही पूर्वयोजना नव्हती. अशा पद्धतीने
अपीलकर्ता आणि बळीत, फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २, ३ आणि ४ यांच्यात
झालेल्या भांडणात बळीत अनावधानाने जखमी झाल्याचे दिसते. त्यामुळे, हे स्पष्टपणे
दिसते की, बळीत यामध्ये लक्ष्य नव्हता. त्यांनी असा युक्तिवाद क
े ला की भा. दं. वि. सं.
चे कलम ३०२, अन्वये अपीलकर्त्याला दोषी ठरवणे हे तथ्य आणि परिस्थितीनुसार
चुकीचे होते आणि पुराव्यांमुळे कलम ३०४, भाग II, भा. दं. वि. सं. अन्वये दंडनीय

े स तयार क
े ले गेली. अपीलकर्ता हा गेली नऊ वर्षांपासून तुरु
ं गात आहे, या
न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावा विचारात घेऊन तसेच त्याला कलम ३०२, भा. दं. वि.
अन्वये दिलेली शिक्षा बदलून कलम ३०४, भाग II, भा. दं. वि. अन्वये त्याने आधीच
कोठडीत घालवलेल्या कालावधीपर्यंतची शिक्षा देणे अगदी योग्य आणि न्याय आहे.
९. दुसरीकडे, सरकारतर्फे हजर झालेल्या विद्वान वकिलांनी सत्र न्यायाधीशांच्या
शिक्षेच्या निर्णयाचे आणि शिक्षेच्या आदेशाचे समर्थन क
े ले. त्यांनी असेही सादर क
े ले
की मा. उच्च न्यायालयाने पुराव्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी कष्ट घेतले आणि शेवटी
मा. सत्र न्यायाधीशांशी सहमती दर्शविली. अपीलकर्त्याने हस्तक्षेपासाठी कोणताही
खटला उभारला नसल्यामुळे, त्यांनी या न्यायालयाला अपील फ
े टाळण्याची विनंती

े ली.
१०. आम्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकले आहे, न्याय चौकशी न्यायालयासमोर त्यांनी पुढे
आणलेल्या पुराव्यांचा विचार क
े ला आहे आणि न्याय चौकशी न्यायालय आणि उच्च
न्यायालयाच्या निर्णयाचा आणि आदेशाचा अभ्यास क
े ला आहे.
११. अपीलकर्त्याच्या दिनांक ३१ मार्च, २०१६ (निशाणी ९६) च्या "लिखित विधान"
[पेपरबुकमधील परिशिष्ट 'पी-१६'] लक्षात घेता फिर्यादी साक्षीदारांच्या तोंडी पुराव्याची
कोणतीही तपशीलवार चर्चा अनावश्यक मानली आहे, जो त्याने त्याच्या बचावासाठी, कलम ३१३ फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या पोटकलम (५) नुसार (संक्षिप्त
'फौ. प्र सं साठी) मा. न्याय चौकशी न्यायालयासमोर दाखल क
े ला होता. याची सुद्धा
नोंद घेतली आहे की कलम ३१३ (१) खालील तपासाच्या कालावधीत अपीलकर्त्याने
प्र. क्र. ७९ चे उत्तर देताना अशा विधानाचा संदर्भ दिला होता.
१२. नि. ९६ चा सारांश, संबंधित मर्यादेपर्यंत, या अपीलावरील निर्णयाच्या उद्देशाने
अपीलकर्ता दर 2-3 महिन्यांनी भाडे वसूल करण्यासाठी नागपूरहून काटोल येथे येत
असे; अपीलकर्ता २६ सप्टेंबर २०१३ रोजी काटोल येथे भाडे वसुलीसाठी आला
होता; अपीलकर्ता क्र
े डिट सोसायटीमधून पैसे काढून घराच्या पायऱ्या चढून परत येत

असताना बळीताने त्याच्या वर थुंकले आणि आज तेरे को फिटते है, तेरा गेम बजाते

है असे म्हणत त्याला धमकावले; अपीलकर्ता त्याच्या घरातून बाहेर पडत असताना, फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ने बळीताला आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ४ ला
“ ”
आला रे आला म्हणत इशारा दिला; अपीलकर्त्याला पाहताच, बळीताने चाक

काढला आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ४ ने फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ३ चा
एक 'फायटर' काढला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात क
े ली; अपीलकर्ता
आपल्या दोन्ही हातांनी चाक
ू घेऊ शकला परंतु त्याच दरम्यान फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र.२ आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. ३ अपीलकर्त्याला मारहाण
करण्यासाठी पुढे आले; त्यावेळी अपिलकर्ता स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत
असताना बळीत आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ते ४ जखमी झाले;
अपीलकर्त्याच्या दोन्ही हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली, छातीवर चाक
ू मुळे
जखम झाली. तसेच छातीवर व उजव्या खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण

े ल्यामुळे जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर ताबडतोब अपीलकर्ता आपल्या
हल्लेखोरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला परंतु ती दाखल करून घेतली
गेली नाही. त्याला त्याचा जखमांवर उपचार न करता रात्री १०.०० वाजेपर्यंत पोलिस
ठाण्यात थांबण्यात आले. त्याने असेही सांगितले की फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २, ३ आणि ४ चे त्याच्याशी संबंध ताणले गेले होते आणि त्यामुळेच त्यांनी त्याला गंभीर
जखमी करण्याचा प्रयत्न क
े ला.
१३. फौ. प्र. सं. चे कलम ३१३, च्या संदर्भात अनेक न्यायिक निर्णय झालेले आहेत.
या टप्प्यावर त्यापैकी काही विचारात घेणे आवश्यक आहे.
१४. ‘
या न्यायालयाच्या तीन माननीय न्यायाधीशांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश

सरकार विरुद्ध लखमी या खटल्यामध्ये फौ. प्र. सं. चे कलम ३१३, खालील नोंद
करण्यात आलेल्या जबाबाचे मूल्य किंवा उपयोगिता या पैलूंवर विस्तृतपणे विचार
मांडला आहे. ‘ ’
या न्यायालयाने सनातन नस्कर विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार मध्ये
फौ. प्र. सं. चे कलम ३१३ च्या उद्देहश्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या न्यायालयाने
‘ ’
रीना हजारिका विरुद्ध आसाम सरकार या खटल्यामध्ये फौ. प्र. सं. चे कलम ३१३
च्चे पालन करण्याच्या आवश्यकते मागील तर्काचा उल्लेख क
े ला आहे. या न्यायालयाने
रीना हजारिका (वर उल्लेखित) आणि एम. अब्बास विरुद्ध क
े रळ सरकार या

खटल्यामध्ये घेण्यात आलेला दुर्ष्टीकोन लक्षात घेऊन परमिंदर कौर विरुद्ध पंजाब

सरकार या खटल्यामध्ये मध्ये, फौ. प्र. सं. चे कलम ३१३ चे महत्त्व पुन्हा सांगितले.
१५. या प्राधिकरणांकडून खालील गोष्टींचा सारांश खालीलप्रमाणे थोडक्यात दिला
जाऊ शकतो.
१ (१९९८) ४ एस सी सी ३३६
२ (२०१०) ८ एस सी सी २४९
३ (२०१९) १३ एस सी सी २८९
४ (२०२०) ८ एस सी सी ८११
५ (२००१) १० एस सी सी १०३
ए. फौ. प्र. सं. चे कलम ३१३ त्याचा गुन्ह्यातील [उप-कलम 1 चे खंड (ब)] हे
आरोपीला निर्दोष ठरवण्यासाठी खटल्याच्या प्रक्रियेत एक मौल्यवान संरक्षण आहे;
बी. कलम ३१३, ज्याचा उद्देश न्यायालय आणि आरोपी यांच्यात थेट संवाद व्हावा
यासाठी आहे, ‍
आरोपीला त्याच्याविरुद्धच्या पुराव्यामध्ये दिसणार्या कोणत्याही
परिस्थितीचे वैयक्तिक स्पष्टीकरण देण्यास सक्षम करण्याच्या हेतूने सामान्यत:
खटल्यातील आरोपीला प्रश्न विचारणे न्यायालयाचे अनिवार्य कर्तव्य आहे. ;
सी. चौकशी क
े ली असता, आरोपी त्याचा गुन्हयातील सहभाग कबुल करणार नाही
आणि आरोप स्पष्टपणे नाकारणे पसंद करेल किंवा न्यायालय त्याला जे काही प्रश्न
विचारेल ते स्पष्टपणे नाकारील;
डी. आरोपी कायदेशीररित्या मान्यताप्राप्त बचावाचा अवलंब करण्यासाठी त्याच्या
विरुद्ध दाखल क
े लेल्या दोषी परिस्थितीची कबुलीही देऊ शकतो
इ. फिर्यादीस आरोपीची उलटतपासणी करण्याचा अधिकार असला तरीही आरोपी

े ल्या जाणाऱ्या उलटतपासणीला न घाबरता जबाब देऊ शकतो.
एफ. आरोपीने जे स्पष्टीकरण दिले आहे ते एकाकी विचारात घेतले जाऊ शकत नाही
तर त्याचा फिर्यादीने जोडलेल्या पुराव्यांसोबत विचार क
े ला पाहिजे आणि म्हणूनच, क्र.
११ दोषसिद्धी क
े वळ कलम ३१३ खालील जबाबाच्या (एस) च्या आधारावर क
े ली
जाऊ शकते;
जी. कलम ३१३ अन्वये तपासणीच्या वेळी आरोपींचा जबाब, शपथेवर नोंदवला गेला
नसल्यामुळे, पुरावा कायद्याच्या कलम ३ खाली पुरावा होत नाही, जरी दिलेली उत्तरे
सत्य शोधण्यासाठी आणि फिर्यादी खटल्याची सत्यता तपासण्यासाठी संबंधित आहेत;
एच. दोषारोपकारक भागावर विसंबून राहण्यासाठी आणि निर्दोष ठरवणाऱ्या भागाकडे
दुर्लक्ष करण्यासाठी आरोपीचे जबाब विच्छेदित क
े ले जाऊ शकत नाही आणि निर्दोष
ठरवणाऱ्या कबुलीची सत्यता तपासण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच संपूर्ण वाचले पाहिजे.
आणि..
आय. जर आरोपीने बचाव क
े ला आणि घटनांची किंवा अर्थाची कोणतीही पर्यायी
हकीकत सांगितली, तर न्यायालयाने त्याच्या जबाबाचे काळजीपूर्वक विश्लेषण क
े ले
पाहिजे आणि विचार क
े ला पाहिजे;
जे. दिलेल्या प्रकरणामध्ये आरोपीच्या दोषी असल्याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाचा
विचार करण्यात अयशस्वी झाल्यास, खटला परिणाम शून्य होऊ शकतो आणि/किंवा
दोषसिद्धी धोक्यात येऊ शकते.
१६. उपरोक्त सुव्यवस्थित तत्त्वे लक्षात घेऊन, कलम ३१३ च्या उप-कलम (१) च्या
खंड (बी) अंतर्गत चालणाऱ्या प्रत्येक मा. फौजदारी न्यायालयाला फिर्यादीने खटला बंद

े ल्यानंतर पुराव्याचे स्क
ॅ निंग करण्याची, शोधून काढण्याची मोठी जबाबदारी पार
पाडावी लागते. ‍
आरोपींविरुद्धच्या पुराव्यांमध्ये १२ दोषी परिस्थिती आणि आरोपींना

संधी देण्यासाठी संबंधित प्रश्न तयार करणे अशा कोणत्याही परिस्थितीचे स्पष्टीकरण
देणे कि त्याच्या विरुद्ध पुरावे म्हणून वापरलं जाऊ शकतात. सन २००९ मध्ये कलम
३१३ मध्ये सुधारणा करण्यापूर्वी हे काम एकट्या न्यायालयांना करावे लागत होते. मा.
न्याय चौकशी न्यायालय संबंधित प्रश्नांची मांडणी करण्यात आणि ते आरोपींना
लावण्यास अपयशी ठरल्याच्या कारणास्तव अपील न्यायालयांद्वारे दोषींवर हस्तक्षेप
करण्याच्या घटना दुर्मिळ नव्हत्या. फौजदारी न्याय प्रणालीला मजबूत करण्यासाठी
आणि विलंब कमी करण्यावर भर देऊन, निष्पक्ष आणि जलद खटल्या चालण्यासाठी
तजवीज होणेसाठी, संसदेने २००९ मध्ये कलम ३१३ मध्ये सुधारणा क
े ली आणि
उप-कलम (५) समाविष्ट क
े ले, ज्यामुळे न्यायालय अशा प्रश्नांची तयारी करण्यासाठी
सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांची मदत घेण्यास सक्षम झाले. [उप-
कलम (५) चा पहिला भाग]. तद्वतच, अशा सहाय्याने (प्रयत्न प्रभावी आणि अर्थपूर्ण
बनवण्यासाठी ते खरे असले पाहिजे आणि लबाडीचे नसावे), कोणीही असा विश्वास ठेवू
शकतो की न्यायालये कदाचित आता संबंधित प्रश्नांची परिश्रमपूर्वक तयारी
करण्यासाठी अधिक सुसज्ज आहेत, जेणेकरून कोणतीही कमतरता येऊ नये. तथापि, न्यायालयीन अनुभवाने असे दिसून आले आहे की, न्याय चौकशी न्यायालयाने
लावलेल्या अशा व्यायामामागील वेळ आणि मेहनत अपेक्षित परिणाम साध्य करत
नाही. कारण एकतर आरोपी आधीच असे ठरवून येऊन उडवाउडवीची उत्तरे देऊन
नकार देतात किंवा ' ’
खोटे आहे , 'मला माहित नाही', 'चुकीचे आहे' इत्यादी सारखी
प्रश्नांची साचेबंद उत्तरे देतात. ‍
बर्याच वेळा, हे आरोपीसाठी चांगल्यापेक्षा अधिक
नुकसान करते. उदाहरणार्थ, जर आरोपीच्या विशेष ज्ञानातील तथ्ये
समाधानकारकपणे स्पष्ट क
े ली गेली नाहीत तर ते आरोपीच्या विरोधात एक कारणीभूत
घटक होऊ शकतो. जरी असा घटक स्वतःच अपराधीपणा शाबीत करण्यासाठी
निर्णायक नसला तरी परिस्थितीच्या संपूर्णतेचा विचार करताना तो लागू होतो.
एखाद्याच्या वर्तनाचे योग्य स्पष्टीकरण किंवा फिर्यादी हकीकत पेक्षा भिन्न हकीकत, उलटतपासणीला सामोरे जाण्यास बाध्य न होता, न्यायालयाला वेगळा दृष्टीकोन
ठेवण्यासाठी आणि त्याच्यासमोरील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक इशारा किंवा
संक
े त देऊ शकते. कलम ३१३ अन्वये क
े लेला वापर कर्मकांडाच्या ऐवजी यथार्थवादी
असला पाहिजे या अर्थाने तो न्यायाचा शेवट सुरक्षित करण्याचे साधन असावे;
ध्येयहीन प्रयत्नाऐवजी, अंताकडे जाणारे साधन हेतूपूर्ण असले पाहिजे. खरंच, कलम
३१३ अंतर्गत आरोपीला त्याच्यासाठी असलेल्या परिस्थितीचे स्पष्टीकरण देणे
ऐच्छिक आहे, परंतु त्याद्वारे प्रदान क
े लेले संरक्षण आणि मौल्यवान अधिकार याची
कल्पना क
े ली तर त्याचा लाभ घेतल्यास किंवा त्याचा वापर क
े ल्यास, तो निर्णायक ठरू
शकतो आणि अंतिम निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. जे प्रभावीपणे वापराच्या
व्यर्थते ऐवजी त्याच्या उपयोगितेला प्रोत्साहन देईल.
१७. फौ. प्र. सं. चे कलम ३१३ च्या पोटकलम (५) अन्वये आरोपीने लेखी जबाब
दाखल क
े ल्यानंतर, आणि कोर्टाने त्याला निशाणी दिली आहे, अस जबाब उप-कलम
(१) उप-कलम (४) सोबत वाचलेले आरोपीच्या जबाबाचा भाग म्हणून मानले जाणे
आवश्यक आहे. अशा प्रकरणाच्या सत्यतेची किंवा अन्यथा प्रशंसा करण्यासाठी
फिर्यादीच्या नेतृत्वाखालील पुराव्याच्या प्रकाशात जबाबाचा विचार करणे आवश्यक
आहे आणि अशा जबाबातील कथनाचा आरोपीच्या बाजूने किंवा त्याच्या विरुद्ध
खटल्याच्या संभाव्यतेसह काळजीपूर्वक विचार क
े ला जातो.
१८. हे असे प्रकरण आहे जिथे लेखी जबाबाने (निशाणी ९६) मा. न्याय चौकशी
न्यायालय तसेच मा. उच्च न्यायालय या दोघांचेही लक्ष वेधून घेतल्याचे रेकॉर्डवरून
दिसून येत नाही. वर नमूद क
े लेली तत्त्वे आणि खाली चर्चा क
े लेल्या कारणांसाठी लागू

े ल्यास, निशाणी ९६ चा विचार न करता भांडण होऊ शकत नाही. मर्यादित
मर्यादेपर्यंत, दोषसिद्धीची नोंद करणे आणि परिणामी शिक्षा ठोठावण्याच्या संबंधात, ते
हस्तक्षेपास असुरक्षित बनवले आहे.
१९. निशाणी 96 हे दोषपूर्ण कबुलीचा संदर्भ देते तसेच निर्दोष ठरवणारी परिस्थिती
बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. जबाब संपूर्णपणे वाचला पाहिजे. अपीलकर्त्याच्या
विरोधात या जबाबातून उद्भवणारे आरोपात्मक कबुली म्हणजे (i) त्याची घटनास्थळी
असलेली उपस्थिती आणि (ii) अपीलकर्ता, दावा क
े ल्याप्रमाणे, जखमी होण्यापासून
स्वतः ला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला बळीत व्यक्ती आणि अन्य
फिर्यादीपक्षाचे साक्षीदार द्वारे दुखापत होणे. निर्दोष ठरवणारे परिस्थिती शाबीत करणे
आवश्यक आहे.
(i) निर्दोष परिस्थिती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न क
े ला (१) अपीलकर्त्याने तक्रार

े लेल्या क
ृ त्याचे वर्णन अनैच्छिक म्हणून क
े ले आहे जे अपरिहार्य परिस्थितीने भाग
पडले गेले आणि स्वच्छेने क
े ले गेले नाही आणि (ii) त्याच घडामोडीत त्याच्याद्वारे
दुखापत झालेली आहे. .
२०. निशाणी ९६ वरून दिसून आलेले दोषपूर्ण कबुली लक्षात घेता, मा. न्याय चौकशी
न्यायालय आणि उच्च न्यायालयाने न्याय चौकशी न्यायालयाशी सहमती दर्शवताना, चौकशी दरम्यान पीडितांच्या सदोष मनुष्य वधासाठी कारणीभूत व्यक्ती म्हणून अपील
कर्त्याला दोषी ठरवण्यासाठी न्यायालाया पुढे सादर क
े लेल्या पुराव्यावर तपशिलात
चर्चा करणे असे जास्त कष्ट करावे लागले नाहीत. निशाणी ९६ वरून अपीलकर्त्याची
घटनास्थळी उपस्थिती आणि हाणामारी दरम्यान झालेली आणि साक्षीदारांना
झालेल्या जखमा शाबीत झाल्या आहेत. तथापि, निशाणी ९६ मध्ये न पाहता
रेकॉर्डवरील इतर पुराव्यांसह, न्याय चौकशी न्यायालयाने काय वगळले ते विचारात
घेणे म्हणजे, हल्ल्याचे क
ृ त्य हे सदोष मनुष्य वधासाठी दोषी आहे किंवा अपीलकर्ता हा
सदोष मनुष्य वधासाठी दोषी नाही म्हणून त्याला भा. दं. वि. सं. कलम 304, भाग II, अन्वये शिक्षा देणेस पात्र आहे का? हे खरे आहे की, मा. न्याय चौकशी न्यायालयाने
अपीलकर्त्याच्या वतीने युक्तिवाद विचारात घेतला कि ज्यामध्ये असे पुढे आले आहे
की (i) त्याने "स्वसंरक्षणाचा अधिकार वापरला" आणि जरी त्याने (ii) " अशा
अधिकाराची मर्यादा ओलांडली असली तरी ", (iii) सध्याचे प्रकरण भा. दं. वि. सं.
कलम ३०४ अंतर्गत येईल, भाग II, ; परंतु, फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ते ४ च्या
तोंडी साक्षीवर अवलंबून राहून अशा युक्तिवादांना खोडून काढण्याचे ठरविले. या
प्रक्रियेत, न्याय चौकशी न्यायालय बचाव पक्षाने निशाणी ९६ वर सांगितलेली
हकीकत विचारात घेतली नाही. जे आम्हाला सत्य असल्याचे दिसते. एक ज्येष्ठ
नागरिक, कि जो नागपूर, त्याचे त्याच्या राहत्या ठिकाणाहून काटोल येथे भाडे
वसुलीसाठी येतो, तो येताना खुनाचा हेतू मनात ठेवून दिवसाढवळ्या आणि
साक्षीदारांच्या उपस्थितीत खून करण्याचा प्रयत्न करू शकत नाही आणि तो ही चाक

सारख्या शस्त्राने. निशाणी ९६ हे जसे आहे तसे वाचताना, आम्हाला असे आढळून
येते की बळीताच्या सांगण्यावरून चिथावणी दिली गेली असावी, ज्याच्यावर
अपीलकर्त्यावर शाब्दिक शिवीगाळ करून थुंकण्याचा आरोप आहे, त्यानंतर फिर्यादी
पक्षाचे साक्षीदार ३ आणि यांनी त्यामध्ये भाग घेतला परिणामी हाणामारी झाली, जिथे
दोन्ही पक्षांनी एकमेकांना दुखापत क
े ली आणि परिणामी एक अवांछित जीवितहानी
झाली.
२१. खेदाने, अपीलकर्त्याच्या वतीने वकिलांनी उच्च न्यायालयाचे निशाणी 96 कडे
वेधून घेतलेले लक्ष येथे दिसत नाही, ज्याचा परिणाम म्हणून न्यायालयाने असे धरले
की भा. दं. वि. सं. चे कलम ३०० मध्ये नमूद क
े लेल्या कोणत्याही अपवादामध्ये क
ृ ती
येत असल्याचे दाखवता येत नाही, " हा अचानक चिथावणीचा परिणाम नाही किंवा
भांडणाच्या वेळी आवेशामध्ये क
े ले गेले नाही" आणि "नंदकिशोरचा मृत्यू हा सदोष
मनुष्यवधाचा गुन्हा आहे असे मानण्यास कोणताही संकोच नाही.
२२. तसे असो, रेकॉर्डवरील पुराव्यावर तसेच निशाणी ९६ वर आधारित आमचे
निष्कर्ष नोंदवण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही, जे अपीलकर्त्याने स्वेच्छेने मा.
न्याय चौकशी न्यायासमोर दाखल क
े लेल्या पुराव्यात दिसणाऱ्या दोषीसिद्धीस
सहाय्यभूत असणाऱ्या वस्तुस्थितिस प्रतिसाद म्हणून दाखल क
े ले कि जे कलम ३१३
अंतर्गत चौकशी करताना त्याच्याविरुद्ध पुरावा म्हणून त्याची किंमत आहे. त्या भयंकर
संध्याकाळी काय घडले हे अपीलकर्त्याच्या हकीकतीमध्ये योग्य आणि योग्य
प्रकटीकरण असल्याचे आम्हाला दिसते. अपीलकर्त्याने क
े लेले गुन्हेगारी क
ृ त्य नमूद

े लेल्या सभोवतालच्या परिस्थितीत विचारात घ्यावे लागेल.
२३. सामान्य घटनांमध्ये, पीडित तसेच फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ आणि
अपीलकर्ता यांनी २६ सप्टेंबर २०१३ रोजी एकमेकांशी संवाद साधला होता असे
गृहीत धरता येत नाही. फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ने बळीताचे दुकान उघडले
कारण बळीत शेतातून परतला नव्हता. जर फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ने दुकान
उघडले नसते तर अपीलकर्ता कदाचित त्याला भेटला नसता. योगायोगाने अपीलकर्ता
आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ एकमेकांना भेटले. बळीत व अपीलकर्त्याचे
एकमेकांशी कोणतेही भांडण नव्हते; जे काही होते, ते अपीलकर्ता आणि फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. २ यांच्यात होते. दोघांमधील भांडण बराच काळापूर्वी मिटले होते.
फिर्यादी खटल्यात एक गहाळ दुवा आहे तो म्हणजे अपीलकर्त्याचा प्रथम फिर्यादी
पक्षाचे साक्षीदार क्र. २ वर प्रहार करण्याचा हेतू काय आहे. फिर्यादी पक्षाचे साक्षीदार
क्र. २ च्या पुराव्यामध्ये तो पीडितेच्या दुकानासमोर बसून वर्तमानपत्र वाचत होता
आणि अपीलकर्ता पीडितेच्या दुकानासमोर असलेल्या बाबुराव सावरकर (तपासणी

े लेले नाही) यांच्या सलूनमध्ये बसला होता. फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ नुसार
अपीलकर्ता सुरुवातीला निशस्त्र होता. फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ची पुढील
हकीकत अशी होती की अपीलकर्ता त्याच्या घरी गेला, चाक
ू आणला आणि नंतर
फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ला त्याच्या डाव्या खांद्यावर, मानेवर आणि डाव्या
हाताच्या बोटावर वार क
े ले ज्यामुळे गंभीर रक्तस्त्राव झाला. अपीलकर्त्याने अचानक
फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ ला पाहिल्यावर त्याच्या घरी जाऊन चाक
ू घेऊन परत
येण्याचे कारण पुराव्यात नाही. आम्ही सध्या असे गृहीत धरू की तेथे गरमागरम
देवाणघेवाण झाली होती आणि अपीलकर्त्याने त्यांना धक्का दिला. प्रथम फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. २, आणि त्यानंतर एक एक करून इतरांना. त्यानंतर पुन्हा, फिर्यादी
पक्षाचे साक्षीदार क्र. २ नुसार, बळीत , शेतात असायला हवी होती, परंतु तो
अचानकपणे दुसऱ्या ठिकाणाहून दृश्यात दिसला. अपीलकर्त्याने वार क
े लेली क्रमवारीत
तो तिसरी व्यक्ती होता आणि त्यामुळे तो त्याचे लक्ष्य नव्हता. जरी अपीलकर्त्याने
बळीताला किंवा इतर जखमींना चाक
ू ने वार क
े ल्याची कोणतीही विशिष्ट कबुली दिलेली
नाही. निशाणी ९६ च्या मजक
ु राचे वाचन क
े ल्याने अचानक चिथावणी देऊन बदला
घेण्याचे क
ृ त्य दिसून येते, ज्यामुळे भांडण तसेच हाणामारी झाली आणि ज्यामुळे
शेवटी, दुर्दैवाने, बळीताचा जीव गेला आणि इतर काही जखमी झाले. अपीलकर्त्याला
सुद्धा हाणामारीत दुखापत झाली होती आणि रेकॉर्डवरील पुरावा आहे की एक जखम
गंभीर होती, तरीही, फौजदारी कायदा आश्चर्यकारकपणे अशा दुखापतीसाठी जबाबदार
असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी गतिमान झाला नाही. हे अचानक झालेल्या
भांडणात होते, जे बळीत आणि फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्र. २ द्वारे चिथावले जाऊ
शकते, त्यानंतर दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या
परिस्थितीत ही घटना घडली ते स्पष्टपणे मनातील पूर्वचिंतनाची कोणतीही सूचना
नाकारते. याशिवाय, बळीत मध्यमवयीन असताना, अपीलकर्ता पन्नाशीच्या उत्तरार्धात
होता हे दुर्लक्षित करता येणार नाही. तथाकथित घटना घडतांना फिर्यादी पक्षाचे
साक्षीदार क्र. २ च्या हकीकती नुसार, फिर्यादी पक्षाचे साक्षीदार २ आणि ३ व्यतिरिक्त, शंकरराव फरतोडे, उमराव चरडे, रमेश कोरडे (तिघेही तपासलेले नाहीत) घटनास्थळी
उपस्थित होते. अशा लोकांच्या उपस्थितीत, अपीलकर्ता, चाक
ू सारखे हत्यार घेऊन, कोणत्याही पुरेशा कारणाशिवाय किंवा चिथावणी शिवाय या सर्वांवर बळजबरी करून
खुनाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी येईल, हे खरोखरच अशक्य आहे.
आमच्या मते, न्याय चौकशी न्यायालयाने वस्तुस्थिती आणि परिस्थितीची तपासणी न

े ल्याने अपीलकर्त्याच्या मनात वाजवी रीतीने भीती निर्माण होण्याची शक्यता आहे
की जर त्याने स्वसंरक्षणासाठी क
ृ ती क
े ली नाहीतर त्याच्या शरीराला मृत्यूचा किंवा
त्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत त्याचावर
त्याने मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने किंवा त्यांना विशिष्ट इजा घडविण्याचा हेतूने
हल्ला करणे कि जो प्राणघातक सिद्ध झाला, असा आरोप करणे अवास्तव वाटते.
२४. भा. दं. वि. सं. कलम ३०० चा अपवाद ४, असे ठरवते की, अचानक झालेल्या
भांडणानंतर उत्कटतेने अचानक झालेल्या भांडणात पूर्वकल्पना न ठेवता आणि
अपराध्याने अवाजवी फायदा घेतल्याशिवाय किंवा क्र
ू र किंवा असामान्य क
ृ त्य

े ल्याशिवाय ती हत्या नाही. त्यावरील स्पष्टीकरण हे स्पष्ट करते की अशा प्रकरणांमध्ये
कोणता पक्ष चिथावणी देतो किंवा पहिला हल्ला करतो हे महत्वाचे नाही. हा अपवाद
शाबीत करण्यासाठी चार आवश्यकता पूर्ण क
े ल्या पाहिजेत, उदा. (i) ही अचानक
लढाई होती; (ii) कोणतीही पूर्वकल्पना नव्हती; (iii) क
ृ ती भावनेच्या आवेशात क
े ली
गेली; आणि (iv) हल्लेखोराने कोणताही अनुचित फायदा घेतला नाही किंवा क्र
ू र किंवा
असामान्य रीतीने वागले नाही.
२५. प्रकरणाचा एक
ं दरीत दृष्टीकोन घेता, आम्ही या मताकडे झुकतो की अपीलकर्ता
भा. दं. वि. सं. चे कलम ३००, अपवाद ४ च्या लाभासाठी पात्र होता.
२६. वरील चर्चेचा निष्कर्ष असा आहे की पीडितेच्या हत्येसाठी अपीलकर्त्याला दोषी
ठरवले जाऊ शकते असे हे प्रकरण नाही. हत्येसाठी त्याची शिक्षा आणि जन्मठेपेची
शिक्षा बाजूला ठेवली जाऊ शकते. त्यानुसार आदेश दिले आहेत.
२७. तथापि, भा. दं. वि. सं. चे कलम ३०४, भाग II, अंतर्गत अपीलकर्त्याला दोषी
ठरवणे आम्हाला योग्य वाटते. अपीलकर्त्याने नऊ वर्षांहून अधिक काळ तुरु
ं गवास
भोगला असल्याने आणि तो सध्या साठच्या दशकाच्या उत्तरार्धात असल्याने, आम्ही
अशा कालावधीसाठी कारावास पुरेशी शिक्षा मानतो. जर तो इतर कोणत्याही
प्रकरणाच्या संबंधात आवश्यक नसेल तर अपीलकर्त्याची ताबडतोब कोठडीतून
सुटका क
े ली जावी,
२८. अपीलकर्त्याने भा. दं. वि. सं. चे कलम ३०७, अंतर्गत गुन्ह्यासाठी ठोठावण्यात
आलेली शिक्षा आधीच भोगलेली असल्याने, अत्यंत संशयास्पद असलेल्या शिक्षेवर
आधारित, आम्ही त्याला सोडून देण्याची परवानगी देतो.
२९. वर नमूद क
े लेल्या मर्यादेपर्यंत अपील मंजूर आहे. खर्चा संबधी आदेश नाही.
३०. विभक्त होण्यापूर्वी, आम्ही असे निरीक्षण करतो की ही अशी घटना आहे जिथे
पोलिसांनी अपीलकर्त्याला झालेल्या दुखापतींचाही तपास करायला हवा होता.
अपीलकर्त्याने चुकीचे दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही उपलब्ध उपायांचा पाठपुरावा

े ला नाही. तथापि, घटना घडून जवळ जवळ एक दशकाला थोडाच कमी कालावधी
लोटला असताना, या अंतरावर तपासाची कोणतीही दिशा फलदायी परिणाम देऊ
शकत नाही. म्हणून आम्ही, असे निर्देश देण्याचे टाळतो. ................................................जे
(एस. रवींद्र भट) ....................................जे
(दीपंकर दत्ता)
नवी दिल्ली, ३ मार्च २०२३.
आयटम क्रमांक १५०१ न्यायालय क्र.१४ विभाग II-A
भारताचे सर्वोच न्यायालय
कार्यवाहीचे रेकॉर्ड
फौजदारी अपील क्र. २११/२०२३
प्रेमचंद …..अपीलकर्ते
विरुद्ध
महाराष्ट्र राज्य ......प्रतिवादी
([ ऐकले: मा. एस. रवींद्र भट आणि मा. दीपांकर दत्ता, JJ.]...प्रवेशासाठी आणि IR
आणि IA क्र.१८४०१५/२०१९-सवलत ओटी दाखल करणे)
दिनांक: ०३-०३-२०२३ आज या प्रकरणामध्ये निकाल देणेसाठी बोलावले होते.
अपीलकर्त्यांसाठी श्री.सुधीर वोडीटेल, ऍड.
श्री रवींद्र बाणा, एओआर
श्री.सीमंता क
ु मार, ऍड.
प्रतिसादकर्त्यांसाठी
वकिलाचे म्हणणे ऐक
ू न घेतल्यानंतर न्यायालयाने पुढीलप्रमाणे आदेश दिला.
आदेश
माननीय श्रीमान न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी माननीय श्रीमान न्यायमूर्ती एस.
रवींद्र भट आणि त्यांचे प्रभुत्व यांचा समावेश असलेल्या खंडपीठाचा अहवाल योग्य
निकाल दिला.
अहवाल करण्यायोग्य न्यायनिर्णयाचा ऑपरेटिव्ह भाग खालीलप्रमाणे वाचतो:
"२६. वरील चर्चेचा निष्कर्ष असा आहे की ही अशी क
े स नाही जिथे अपीलकर्त्याला
खुनासाठी दोषी ठरवले जाऊ शकते आणि बळीताला शिक्षा दिली जाऊ शकते. त्याची
जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार आदेश दिले आहेत.
२७. तथापि, भा. दं. वि. सं. चे कलम ३०४ भाग II, अंतर्गत अपीलकर्त्याला दोषी
ठरवणे आम्हाला योग्य वाटते, अपीलकर्त्याने नऊ वर्षांहून अधिक काळ तुरु
ं गवास
भोगला असल्याने आणि तो सध्या साठच्या दशकाच्या उत्तरार्धात असल्याने, आम्ही
अशा कालावधीसाठी कारावास पुरेशी शिक्षा मानतो. जर इतर कोणत्याही प्रकरणाच्या
संबंधात अपीलकर्त्याची आवश्यक नसेल तर त्याची ताबडतोब कोठडीतून सुटका
करावी. , २८. अपीलकर्त्याने भा. दं. वि. सं. चे कलम ३०७, अंतर्गत गुन्ह्यासाठी ठोठावण्यात
आलेली शिक्षा आधीच भोगलेली असल्याने, अत्यंत संशयास्पद असलेल्या शिक्षेवर
आधारित, आम्ही त्याला सोडून देण्याची परवानगी देतो.”
स्वाक्षरी क
े लेल्या अहवाल करण्यायोग्य निकालाच्या संदर्भात अपीलला परवानगी
आहे.
सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
(नीता सप्रा) (मॅथ्यू अब्राहम)
कोर्ट मास्टर (एसएच) कोर्ट मास्टर (एनएसएच)
(स्वाक्षरी क
े लेला अहवाल करण्यायोग्य निर्णय फाइलवर ठेवला आहे)
अस्वीकार
या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा पक्षकारास
त्याच्या तिच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित राहील
आणि त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता येणार नाही तसेच इंग्रजी
भाषेतील न्याय निर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता
विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि अंमलबजावणी
करता वैध मानला जाईल. x-x-x-x
JUDGMENT